Agro-महाराष्ट्र-News

reshim udyog रेशीम उद्योग रेशीम उद्योग अनुदान 2024

reshim udyog रेशीम उद्योग रेशीम उद्योग अनुदान 2024
नमस्कार
रेशीम उद्योग ही योजना भारत सरकारने खूप अगोदर पासून राबवली आहे ही योजना खूप जुनी आहे
रेशीम उद्योग हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून ओळखला जातो
1)रेशीम उद्योग माहिती 2) रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र 3) रेशीम उद्योग अनुदान 2024 4) भारतात रेशीम उद्योग या राज्यात मोठ्या प्रमाणात चालतो 5) रेशीम उद्योग फोटो 6) रेशीम उद्योग उद्दिष्टे 7)खरेदी समिती
याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे सविस्तर वाचा

reshim udyog

रेशीम उद्योग

reshim udyog

गावसमूहांमध्ये तुती लागवड करून रेशीम उत्पादनात वाढ करणेसाठी व या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी या घटकाचा समावेश नानाजी देशमुख कृषि संजीवनी या प्रकल्पात करण्यात आलेला आहे.

लाभार्थी निवडीचे निकषः
• पात्र अर्जदारांमध्ये सिंचनाची सोय असलेले अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची, अनु. जाती/ अनु. जमाती/ महिला / दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्य क्रमाने निवड केली जाईल.
• तुतीच्या झाडांना जागवून वृद्धीकरता आवश्यक किमान संरक्षित सिंचन व्यवस्था असावी.
• समूह पद्धतीने गावात लागवडीकरिता प्राधान्य द्यावे. जमिनीचा मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी असावी.
• घरातील किमान एक व्यक्ती स्वतः शेतात तुती लागवड, संगोपनाचे काम करणारी असावी. रेशीम शेती उद्योगाकरिता निवडलेल्या शेतकऱ्यांचे लागवडपूर्व व लागवडीनंतर रेशीम किडी संगोपनाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
• हे प्रशिक्षण जुन्या शेतकऱ्याच्या शेतावर, कृषि विज्ञान केंद्र अथवा पंजीकृत व अधिकृत रेशीम संचालनालयाची मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था अथवा शेती शाळा, कृषि विद्यापीठ यांचेकडे उप विभागीय कृषि अधिकारी यांनी आयोजित करतील.
रेशीम उद्योगाचे महत्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना सक्षम करणे.ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे.कारण रेशीम उद्योग साठी कमी पाणी लागते.

खरेदी समिती

१. सरपंच- पदसिद्ध अध्यक्ष
२. उपसरपंच पदसिद्ध सदस्य
३. ग्राम कृषि संजीवनी समिती (VCRMC) सदस्यांपैकी एक महिला सदस्य – सदस्य
४. कृषि मित्र / कृषि ताई – सदस्य
५. रेशीम संचालनालयाचा तालुका स्तरावरील प्रतिनिधी.
६. लाभार्थ्याने
७. कृषि सहाय्यक – सचिव
८. (अनुक्रमांक १, २, ३ पैकी किमान १ सदस्य, कृषि मित्र / कृषि ताई, रेशीम संचालनालयाचा तालुका स्तरावरील प्रतिनिधी, कृषि सहाय्यक व लाभार्थी यांची खरेदीच्या वेळी उपस्थिती अनिवार्य आहे)

तांत्रिक बाबी :
प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या रेशीम उद्योग लाभार्थ्यांना तुती लागवडीकरिता आवश्यक रोपांचा पुरवठा करण्याचे नियोजन व कार्यवाही संबंधित उप विभागीय कृषि अधिकारी करतील.
तुती रोपाकरिता शासकीय रेशीम फार्म, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठे, शासकीय रोपवाटीका, सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीका इ. ठिकाणी तुती रोपे उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात येईल. तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांना दर्जेदार रोपांची निर्मिती स्वतःच्या क्षेत्रावर तयार करण्याची मुभा असेल.
तुती लागवडीचा कालावधी जून ते सप्टेबर अखेर पर्यंत राहील. लाभार्थ्याने किमान ३ वर्षे व्यवसाय करावा.

मापदंड व अर्थसहाय्यः
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग या घटकांतर्गत सामान्य प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५% व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती करिता अर्थसहाय्य ९०% आहे.

reshim udyog training

रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र

महाराष्ट्रात अशी शासकीय संस्था म्हणजे Central Silk Research Training Institute. ही संस्था औरंगाबाद येथे आहे. अन्य अनेक संस्था या खाजगी आहेत. महाराष्ट्र शासनाचे रेशीम संचालनालय असून ही आहे. यांच्याकडे रेशीम शेती व उद्योग याविषयीची पुस्तिका उपलब्ध आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मात्र शासकीय प्रशिक्षण संस्था आहेत. नाशिक येथे एक खाजगी प्रशिक्षण संस्था आहे. त्याचबरोबर या विषयावर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी केलेली रेशीम शेती व त्यांचे अनुभव यावर यूट्यूबवर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. हे शेतकरी अनेक होतकरू शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करतात.
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रेशीम संचालनालय ऑफिस आहे. त्यांच्याकडे रेशीम प्रशिक्षण मिळते. या ठिकाणी माहिती पुस्तिका, माहितीपत्रक मिळतात. कृषी विभागाकडूनही प्रशिक्षण दिले जाते.

reshim udyog subsidy

रेशीम उद्योग अनुदान 2024

शेतकऱ्यास सी.डी.पी. अंतर्गत किटक संगोपनगृह उभारणीस 1 लाख रुपये, 1 लाख 50 हजार रुपये व 2 लाख रुपये तसेच एकूण प्रत्यक्ष खर्च विचारात घेऊन 50 हजार रुपये, 75 हजार रुपये आणि 1 लाख रुपये अनुदान दिले जाते.

भारतात रेशीम उद्योग या राज्यात मोठ्या प्रमाणात चालतो

कर्नाटक हा भारतात सर्वात जास्त कच्चा रेशीम उत्पादनात पुढे आहे.
भारतात सर्वात प्रसिद्ध रेशम हे तुती रेशीम आहे.तुती रेशीम हे सर्वात जास्त तामिळनाडू,कर्नाटक ,आंधप्रदेश,पश्चिम बंगाल आणि जम्मू काशिमीर हि राज्य जास्त उत्पादन घेतात.

रेशीम उद्योग फोटो

रेशीम उद्योग उद्दिष्टे

reshim udyog project report

१.रेशीम उद्योगाच्या माध्यमातून प्रकल्पांतर्गत समाविष्ठ असलेल्या गावातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करून उत्पनात वाढ करणे.

२.रेशीम उद्योगावर आधारित समूहाचा सर्वागीण विकास करणे.

३.रेशीम उद्योगामध्ये महिलांचा समावेश वाढवणे.

४.नाविन्यपूर्ण रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपरेंत पोहचवणे.

५.रेशीम योजनेची फलश्रुती व यशस्वीता याबाबत व्यापक प्रसिद्धी देऊन शेतकऱ्यांना या उद्योगासाठी प्रोत्साहित करणे.

६.यातून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.

७.शेतकऱ्यांना सक्षम बनवणे.

https://today-report.com/sukanya-samriddhi-yojana/सुकन्या समृद्धी योजना

whats app group join kara

Exit mobile version