Agro-महाराष्ट्र-News

pokra scheme maharashtra पोकरा योजना महाराष्ट्र (2024)

पोकरा योजना महाराष्ट्र पोकरा योजना महाराष्ट्र (2024)
नमस्कार
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना ही योजना अत्यंत महत्त्वाची
महाराष्ट्र सरकारने आत्ताच पोकरामध्ये नवीन गावाचा समावेश केला आहे
नवीन गावाची समावेश यादी जाहीर केलेली आहे
पोकरा योजना काय आहे याची माहिती संपूर्ण खालील प्रमाणे दिले आहे
1) योजनेसाठी अर्ज कुठे करायचा 2) पोकरामध्ये कोणकोणत्या योजना येतात 3) योजनेसाठी लागणारे कागदपत्रे 4)पोकरा योजना म्हणजे काय 5) पोकरा योजनेमध्ये एकूण किती गावे समावेश आहेत 6) शेतकरी गट तयार करणे
याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे सविस्तरपणे वाचा

pokra scheme maharashtra

पोकरा योजना महाराष्ट्र (2024)

pokra online application

योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

या प्रकल्पांतर्गत विविध बाबींकरीता लाभ घेण्यासाठी शेतकरी अर्जदारांनी प्रकल्पाच्या

www.mahapocra.gov.in या संकेतस्थळी online नोंदणी करून प्रकल्पांतर्गत समाविष्ट प्रत्येक बार्बीकरिता स्वतंत्रपणे online अर्ज करावा

अर्ज सादर करताना खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.

• अर्जदाराचा ७/१२ व ८ अ चा उतारा.

There are scheme in pokra

पोकरामध्ये कोणकोणत्या योजना येतात

1. प्रकल्प अर्थसहाय्याचे प्रमाण

2. हवामान अनुकूल कृषी पद्धतीस प्रोत्साहन देणे

3. सहभागीय पद्धतीने गाव समुहाचे नियोजन

4. सहभागीय पद्धतीने गाव समुहावा नियोजन आराखडा तयार करणे

5. कृषी मित्र/कृषी ताई यांचे सहकार्याने जागृती

6. हवामान अनुकूल कृषि पद्धती

7. हवामान अनुकुल तंत्रज्ञान शेती शाळा

8. जमिनीमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे

9. वृक्षलागवड (बांधावर / गटामध्ये लागवड)

10. फळबाग लागवड-आंबा / लिंबू वर्गीय फळे /आवळा / सीताफळ / पेरू / डाळिंब

11. क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन (खारपाणग्रस्त गावे)

12. सबसरफेस ड्रेनेज

13. हवामान अनुकुल तंत्रज्ञान शेती शाळा

14. शेततळे (जैविक बांधासह इनलेट व आऊटलेट असलेली)

15. पाणी उपसा साधने (पंपसंच)

16. पॉली टनेल (१००० चौ.मी.)

17. पॉली हाऊस / शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला / फुलपिकांचे

18. उच्चमुल्यांकित लागवड साहित्य

19. पॉली टनेलमध्ये भाजीपाला / फुलपिकांचे उच्च मुल्यांकित

20. लागवड साहित्य

21. एकात्मिक शेती पद्धती

22. बंदिस्त शेळीपालन

23. कुक्कुट पालन

24. रेशीम उद्योग

24. मधुमक्षिका पालन

25. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन

26. इतर कृषि आधारित उद्योग

27. जमीन आरोग्य सुधारणे

28. गांडूळ खत आणि नाडेप पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा उत्पादन

29. सेंद्रिय खत निर्मिती युनिट

30. पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर

31. सलग समतल चर मॉडेल ५ ते ८ (०.३० मीटर)

32. सलग समतल चर मॉडेल ५ ते ८ (०.४५ मीटर)

33. खोल सलग समपातळी चर

Documents required for the scheme

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

अर्जदाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे
आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
अर्जदाराचा सातबारा आठ अ चा उतारा
अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास त्याचा पुरावा
अर्जदार अपंग असल्यास त्याचा पुरावा
बँक पासबुक

What is a pokra scheme?

पोकरा योजना म्हणजे काय?

महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अंतर्गत पोखरा ही योजना येत आहे पोखरा ही योजना शेतकऱ्यांसाठी बनवले आहे पोखरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय सफल आणि उत्तम योजना आहे

How many villages are included in Pokra Yojana?

पोकरा योजनेमध्ये एकूण किती गावे समावेश आहेत

जिल्हाप्रकल्प गावे
औरंगाबाद406
अमरावती५३२
बीड391
बुलढाणा414
जालना363
अकोला४९८
लातूर२८२
वाशिम१४९
उस्मानाबाद२८७
यवतमाळ३०९
नांदेड३८४
वर्धा१२५
परभणी२७५
जळगाव४६०
हिंगोली२४०
एकूण५१४२

Forming a group

शेतकरी गट तयार करणे

वेगवेगळ्या पिक निहाय किंवा कृषी उत्पादन निहाय शेतकरी यांचे गट तयार करणे यामध्ये अपेक्षीत आहे.

एका गटा मध्ये 20-25 शेतकरी असावेत. 

गटाच्या सदस्यांची बैठक महिन्यातून किमान एक वेळा होणे अपेक्षीत आहे

तालुक्यातील त्या त्या पिकांचे गट एकत्र येउन गटांचा तालुका स्तरावर संघ करता येइल. 

तसेच सर्व तालुक्यातील त्या विशिष्ट पिकाचे गट मिळून शेतकरी उत्पादक कंपनी तयार करता येइल. 

गटांनी सर्व अभिलेखे, वेगवेगळ्या  नोंद वह्या व रजिस्टर तसेच रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. उदा. बैठकांचे इतिवृत्त, बँक पासबूक रकमांचा हिशेब इ

1.या गटांना क्षमता वृद्धी, कौशल्य विकास यासाठी रु.5000 प्रती गट या प्रमाणे सहाय्य करण्यात येते.

2.तसेच सक्षम गटास बीज भांडवल/फिरता निधी यासाठी रु.10000 प्रती गट याप्रमाणे सहाय्य करण्यात येते.

3.याव्यतिरिक्त महिलांचे अन्न सुरक्षा गट तयार करण्यात येतात. या गटांना परसबाग, कुक्कुट पालन, शेळी पालन, अळिंबी ऊत्पादन, पशू संवर्धन इ . व्यवसाय सुरु करणेसाठी प्रशिक्षण, प्रकाशने व निविष्ठा खरेदी यासाठी रु.10000 इतके बीज भांडवल देण्यात येते.

4. उत्कृष्ट रित्या संघटीत असणारा व कार्य करणारे शेतकरी गटास रु.20000 इतके पारितोषीक देण्यात येते.
5. आवश्यक कागदपत्र- 
गटाच्या प्रथम सभेचे इतिवृत्त 
सदसयांचे वैयक्तिक अर्ज 
सदस्यांचा ७/१२ व ८ अ 
ओळख पत्र – आधार कार्ड / मतदान कार्ड 
गटाचा करारनामा 
गट नोंदणी फी रु. १००

सुरज चव्हाण मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता link

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना link

Exit mobile version