kukut palan subsidy in maharashtra kukut palan yojana 2024
नमस्कार
कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करणाऱ्या बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे
नवीन व्यवसाय चालू करणाऱ्यास अनुदान जाहीरज्याला कोणाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे
1) kukut palan yojana2024 2) kukut palan mahiti 3) kukut palan yojana online form 4) maharashtra kukut palan karj yojana 5) kukut palan anudan yojana 6) kukut palan yojana Document
या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
kukut palan yojana 2024
kukut palan yojana Document
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
- अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
- अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीसाठी तलाठी/तहसिलदार यांचेकडील प्रमाणपत्र
- विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिलांकरिता ग्रामसेवक यांचे अभिप्राय
- विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिला यांचे स्वयंघोषणा पत्र
- खरेदी समितीचे प्रमाणपत्र
kukut palan yojana2024
पात्रता निकष
- या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.
- प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावातील ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या महिला, घटस्फोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
- पक्षी खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थीने स्वत: करावयाचा आहे.
- प्रकल्प कालावधीत या घटकाचा एका लाभार्थीस एकदाच लाभ घेता येईल.
- एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- मार्गदर्शक सुचनेमधील नमूद पक्षांच्या प्रजाती पैकी पक्षी खरेदी करणे आवश्यक आहे.
- निवड केलेल्या लाभार्थ्यांना आवश्यकता असल्यास कुक्कुट पालनाचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल.
- लाभार्थीने सदरचा व्यवसाय हा किमान ३ वर्षे करणे आवश्यक आहे.
- पक्षी जोपासण्यासाठी खाद्य व पाण्याची भांडी इ. व्यवस्था लाभार्थ्याने स्वत: करावयाची आहे.
- मापदंडाव्यतिरिक्त जादाचा खर्च लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे.
- शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राज्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील जे व्यक्ती कुकुट पालनासाठी इच्छुक आहेत त्यांना कुकुट पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी 75 टक्के म्हणजे 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येते.
- राज्य शासन राज्यातील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक कुकुट पालन योजना आहे.
- राज्यातील बहुतांश युवक स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात त्यांना कुकुट पालन व्यवसाय हा एक उत्तम पर्याय मानला जाऊ शकतो त्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त व्हावा व राज्यातील बेरोजगार कमी होऊन पशु पालनाला चालना मिळावी व राज्याचा औद्योगिक विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून राज्यात कुकुट पालन योजनेची सुरुवात करण्यात आली.
maharashtra kukut palan karj yojana
महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना
योजनेचे नाव | महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना |
राज्याचे नाव | महाराष्ट्र |
वर्ष | 2024 |
विभागाचे नाव | कृषि विभाग महाराष्ट्र शासन |
लाभ | 50 हजारापासून ते 10 लाखापर्यंत कमी व्याज दराने मदत |
उद्देश्य | रोजगार निर्मिती व आर्थिक सहाय्यता करणे |
आवेदन प्रक्रिया | ऑफलाइन |
वेबसाइट | https://dbt.mahapocra.gov.in/ |
kukut palan anudan yojana
महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज अनुदान संस्था
कुकुट पालन कर्ज योजना 2024 अंतर्गत कुकुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात राहणारा कोणताही गरीब नागरिक, मजूर किंवा शेतकरी कर्ज घेऊ इच्छित असल्यास खाली नमूद केलेल्या बँकांकडून कर्ज मिळवू शकतो, जसे की-
राज्य सहकारी बँक
ग्रामीण विकास बँक
प्रादेशिक ग्रामीण बँक
सर्व व्यापारी बँका
राज्य सहकारी कृषी
kukut palan yojana online form
कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज
महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही नागरिकाला अर्ज करताना अर्जासोबत खालील महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील, जी खाली शिक्षामित्र फॉर्ममध्ये उपलब्ध आहे.
1. पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
रेशन कार्ड
आधार कार्ड
मतदान कार्ड
बँक खात्याची माहिती
पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
रहिवासी दाखला
जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
kukut palan mahiti
योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांचा स्वतःचा कुकुट पालनाचा व्यवसाय सुरू इच्छुक आहेत, अशा तरुणांना 75% आर्थिक अनुदान देणे हा आहे.
- पशु पालन या व्यवसायाला चालना देणे.
- महाराष्ट्रातील राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे.
- महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकऱ्यांना शेती सोबतच एक जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन व्यवसाय सुरू होत आहे.
- महाराष्ट्र राज्याचा औद्योगिक विकास करणे आणि तरुणांना व्यवसायाकडे आकर्षित करणे