Bopdev Ghat Gangrape भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार
नमस्कार
बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात अनेक बाबी समोर आले आहेत
1) भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार 2) भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार घटना उघडकीस आली कशी ? 3) भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कारडीएलएसएने पीडितेला 5 लाख रुपयांची भरपाई दिली 4) भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कारप्रकरणातील दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत 5) भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींचं स्केच, सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील सर्व बाबी समोर आलेल्या आहेत ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ
भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार
Bhopdev Ghat 21-year-old girl raped
भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार
पुण्याच्या एका कॉलेजमध्ये शिकणारे पुण्याच्या बाहेरच एक तरुण आणि तरुणी रात्री अकराच्या सुमारास भोपदेवघाटात फिरण्यासाठी गेले होते त्यानंतर गप्पा मारत बसले होते काही ठिकाणी कॉर्नरला असणारे व्ह्यू पॉईंट आहेत एक दोन ठिकाणी मोकळी मैदान आहेत तर घाट रस्ता असल्यामुळे अर्थातच टेकड्या आहेत अशाच एका मोकळ्या मैदानात हे जोडपं गप्पा मारत बसले होते.
साधारण तासभर उलटून गेला होता रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तिथे तीन अज्ञात व्यक्ती आल्या त्या दोघांना घेरलं मुली सोबत असणाऱ्या तरुणाला त्यांनी मारहाण केले आणि त्याला शर्ट आणि बेल्टने तेथे असलेल्या एका झाडाला बांधून ठेवलं त्यानंतर या तिन्ही व्यक्तींनी या तरुणीवर सामूहिक अत्याचार केले आणि पसार झाले.
Bhopdev Ghat How did the rape incident on 21-year-old girl come to light?
भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार घटना उघडकीस आली कशी ?
पहाटे ही घटना उघडकीस आले आपल्या मैत्रिणीला पहाटेच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये नेलं पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तरुणांना आपल्या मैत्रिणीला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेलं होतं पण सामूहिक अत्याचार प्रकरण असल्याने या मुलीला ससून मध्ये रेफर करण्यात आलं त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली झालेल्या मेडिकल टेस्टमध्ये या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवले पोलिसांच्या एका पथकाने पीडित तरुणीचा जबाब घेतला तर एका पथकाने घटनास्थळीत धाव घेतले धर्मनुष्य असलेल्या घटनास्थळी पोलिसांनी डॉग्स च्या साहाय्याने तपास केला वेळेत तरुणीच्या तक्रारीनुसार पोलि सांनी तीन अज्ञात व्यक्तींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहेत त्यांचा तपास सुरू आहे.
पण गंभीर गोष्ट म्हणजे ही सगळी घटना घडली भोपदेव घाटातल्या पोलीस चौकीच्या मागे घाट रस्ते या आदी घडलेल्या लुटमार आणि इतर घटना त्यामुळे पोलिसांनी पोलीस मदत केंद्र उभारला आहे मदत केंद्रासाठी देण्यात आले घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस मदत केंद्रात सतत पोलीस नसतात तर गाड भागात ग्रस्त घालणारे पेट्रोलिंग करणारे पोलीस हे पोलीस मदत केंद्रात थांबत असतात पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आला असलं तरी घटना घडली तेव्हा पोलीस मदत केंद्रात कोणीच नव्हतं का आणि जर तिथं कोणी नसलं तर पोलीस ग्रस्त घालत असतील तर त्यांना या घटनेचा अंदाज आला नाही का जर या भागात ग्रस्त सुरू असते तर असा गंभीर गुन्हा करण्याआधी गुन्हेगारांना भीती बसले नाही का असे प्रश्न हे उपस्थित होत आहेत.
Bhopdev Ghat rape of 21-year-old girl DLSA awarded Rs 5 lakh compensation to the victim
भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कारडीएलएसएने पीडितेला 5 लाख रुपयांची भरपाई दिली
शनिवारी DLSA ने जारी केलेल्या एका प्रेस रिलीझमध्ये असे म्हटले आहे की नुकसान भरपाई देण्याचा निर्णय उल्लेखनीय गतीने घेण्यात आला होता आणि ते “घृणास्पद गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना वेळेवर आधार देण्यासाठी कायदेशीर व्यवस्थेची वचनबद्धता अधोरेखित करते.”
बारामतीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे बोलल्या ” काय सुरू आहे महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणावं लागत आहे”. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तिघांचे एन्काऊंटर फडणवीस यांनी करावे. पोलिसांची दहा पदक सध्या आरोपींच्या मागावर आहेत पोलिसांनी संशयित आरोपींची स्केचेस सुद्धा तयार केली आहेत त्यामुळे सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं नेमक्या प्रसार कसा झाल्या त्या प्रश्नांची उत्तर आता आरोपी पकडल्यावरच मिळणार आहेत.
Bhopdev Ghat 21-year-old girl rape case second accused arrested from Uttar Pradesh
भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कारप्रकरणातील दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून सोमवारी अटक केली.
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून सोमवारी अटक केली. सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (१५ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शेख, कनोजिया यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबर रोजी रात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता.
Bhopdev Ghat sketch of accused who raped 21-year-old girl, CCTV video surfaced
भोपदेव घाट 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींचं स्केच, सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
पुण्यातील बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पोलिसांनी पीडिता आणि तिच्या मित्राच्या मदतीने दोन फरार आरोपींचे रेखाचित्र बनवून व्हायरल केले आहे.
पुण्यातील बोपदेव घाट येथे मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर एका आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. मात्र दोन आरोपी फरार आहेत. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी रेखाचित्र जाहीर केले असून तीनही आरोपींचे सीसीटीव्ही फुजेटही समोर आले आहे. गुरुवारी (दि. ३ ऑक्टोबर) रोजी हा गुन्हा घडला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींचे रेखाचित्र तयार करून पोलीस ठाण्यात पाठविले गेले आहे. पीडिता आणि तिच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे, एका आरोपीचे चित्र ९० टक्के मिळतेजुळते असून दुसऱ्या आरोपीचे चित्र ७० टक्के जुळत आहे. हे दोन्ही चित्र पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केले असून दोन्ही आरोपींची काहीही माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.