सरकारने सोयाबीनचा हमीभाव केला जाहीर
शेतकरी हा विकासाचा महत्त्वाचा वाटेकरी आहे, तो सुखी असला तरच आपला देश सुखी आहे..
आपल्या दौऱ्यानिमित्त जात असताना सांगवी काटी गावातील शेतकरी सोयाबीन पिकाचे हार्वेस्टिंगचे काम करत होते.. या प्रसंगी थांबून त्यांची भेट घेतली.
कोणते बियाणे वापरले, पेरणी केव्हा केली, पिकाला किती कालावधी दिला व हार्वेस्टिंगचा खर्च किती होणार, अशी संपूर्ण माहिती शेतकरी बांधवांकडून घेतली.
शेतकरी हा मोठ्या कष्टाने व मेहनतीने काम करून उत्पादन घेत असतो. त्यामुळे त्याच्या कष्टाला व बहिणीला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे अशी आपली नेहमीच भूमिका असते..
सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने 4892 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होत आहे.
पुढील ९० दिवस हे खरेदी केंद्र सुरू राहणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष मान्यता केंद्र सरकारने दिली आहे.
केंद्र सरकार सोयाबीनचे भाव ५००० असावा यासाठी उपाययोजना करत असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
https://today-report.com/namo-shetkari-yojna/
https://today-report.com/bhopdev-ghat-21-year-old-girl-raped/