Agro-महाराष्ट्र-News

धाराशिव जिल्हा 2024 Dharashiv District 2024

धाराशिव जिल्हा 2024 Dharashiv District 2024नमस्कारधाराशिव जिल्ह्यामध्ये किती मतदारसंघ आहेत व एकूण उमेदवार किती उभारले आहेत याची माहिती बघणार आहेत आपण
1) धाराशिव कळंब मतदारसंघ 2) तुळजापूर मतदारसंघ 3) भूम परंडा वाशी मतदारसंघ 4) लोहारा उमरगा मतदार संघ
या तालुक्यांमध्ये कोणत्या तालुक्यात किती उमेदवार आहेत याची माहिती खालील प्रमाणे

Dharashiv District 2024

Dharashiv District 2024

धाराशिव जिल्हा 2024

मतदार संघ क्रमांकनाव
240उमरगा
241तुळजापूर
242धाराशिव
243परंडा

Dharashiv Kalamba Constituency

धाराशिव कळंब मतदारसंघ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघातून आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली..

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे, खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व महाविकास आघाडीतील नेते, तसेच आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले धाराशिव-कळंबचे मतदार बंधू-भगिनी, कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक यांचे मन:पूर्वक आभार..

गेल्या पाच वर्षांत धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावत धाराशिव-कळंब वासियांचा विश्वास सार्थ ठरवता आला, त्यांच्या या विश्वासाला पात्र राहत आगामी काळातही आपण अतिशय कर्तव्य दक्षतेने आणि प्रामाणिक पणे कार्यरत राहू आणि त्यासाठी धाराशिव-कळंबची जनता नेहमीप्रमाणे या वेळीही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, हा विश्वास आहे.

Dharashiv District Tuljapur Constituency

धाराशिव जिल्हा तुळजापूर मतदारसंघ

Tuljapur Assembly Constituency: तुळजापूरच्या मातीत कमळ बहरणार की हात पुन्हा पकड घेणार? राणाजगजितसिंह पाटील यांच्यासमोरील आव्हाने काय?
Tuljapur Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच कमळ फुलले. पण यावेळी त्यांच्यासमोर
महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असणार आहे.
Tuljapur Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी २०१९ साली राष्ट्रवादीकडून धाराशिव (तेव्हाचा उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र ओमराजे निंबाळकर (संयुक्त शिवसेना) यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर काहीच महिन्यांनी राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. तत्पूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे १९९९ पासून सलग चार वेळा निवडून आले होते. भाजपाच्या तिकीटावर राणा जगजितसिंह पाटील यांनी चव्हाण यांचा पराभव करत पहिल्यांदाच तुळजापूरात कमळ फुलवले.

Dharashiv District Bhum Paranda Vashi Constituency

धाराशिव जिल्हा भूम परंडा वाशी मतदार संघ

धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. एकतर महाविकास आघाडीकडे हा मतदारसंघ कुणाकडे जाणार? याबद्दल उत्सुकता आहे. २००४ ते २०१४ अशा सलग तीन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते राहुल मोटे याठिकाणी निवडून येत होते. मात्र २०१९ साली शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी त्यांचा पराभव केला. राहुल मोटे हे शरद पवारांबरोबर राहिल्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघाची मागणी होऊ शकते. त्यातच तानाजी सावंत यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षालाही वादग्रस्त विधानांमुळे अंगावर घेतलेले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाकडून निवडणुकीत काय भूमिका घेतली जाते, हेही महत्त्वाचे

Dharashiv District Lohara Umarga Constituency

धाराशिव जिल्हा लोहारा उमरगा मतदार संघ

ज्ञानराज धोंडिराम चौगुले मराठी राजकारणी आहेत. हे उमरगा मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा लोहारा मतदारसंघातील विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून चार उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे.उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाकडून चार स्वामींनी उमेदवाराची मागणी केली आहे. आमदार ज्ञानराज चौगुले यांची ही तिसरी टर्म असून शिवसेनेतील काही आमदारांनी उठाव केला होता. यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमदार ज्ञानराज चौगुले हे सुद्धा शिंदे गटात गेले होते. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ज्ञानराज चौगुले यांची ओळख आहे.

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याच्या हालचाली महाविकास आघाडीच्या गटातून होत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या उमरगा लोहारा मतदारसंघात उबाठा गटाकडून चार स्वामींनी मागणी केली आहे. विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात सध्या तरी तुल्यबळ उमेदवार नसल्याने आमदार ज्ञानराज चौगुले यांना ही निवडणूक सोपी जाईल असे दिसते. परंतु महाविकास आघाडी कडून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार शोधण्याची शोधमोहीम सुरू आहे. आमदार ज्ञानराज चौगुले यांना पराभूत करण्याचा चंग उभाटा गटाकडून बांधला गेला आहे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

Exit mobile version